छोट्याशा पोर्टलवरून प्रिंट मिडियात प्रदार्पण
पहिल्या साप्ताहिक अंकाचे आमदार करण
देवतळे यांचे हस्ते शुभारंभ
वरोरा : स्वतंत्र विदर्भ नावाच्या पोर्टल चे माध्यमातून पत्रकारिता सुरू करून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील स्थितीचा सतत मागोवा घेऊन जनतेसमोर मांडण्याचा वसा घेणारे वरोरा शहरातील युवक अभिषेक भागडे यांनी प्रिंट मिडियात प्रथम पाऊल ठेवले आहे.थोड्याच दिवसात स्वतंत्र विदर्भ नावाच्या पोर्टल पासून आपल्या पत्रकारितेला सुरुवात करून त्यांनी साप्ताहिक सुरू केले.पत्रकारिता क्षेत्रात दुसरे पाऊल स्वतंत्र विदर्भ या पहिल्या साप्ताहिकाचा माध्यमातून प्रिंट मीडियामध्ये टाकले.स्वतंत्र विदर्भ या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचा शुभारंभ आमदार करण देवतळे यांच्या हस्ते पार पडला.साप्ताहिक प्रकाशन कार्यक्रमात भागडे परिवार सह मित्रमंडळी उपस्थित होते.







