Home Breaking News ” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल तर्फे नीरज आत्राम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक...

” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल तर्फे नीरज आत्राम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित “

3

” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल तर्फे
नीरज आत्राम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित “

वरोरा :आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील नीरज महादेव आत्राम यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेऊन आणि ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सुसंस्कार, राष्ट्रसेवा, सुशील चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यासाठी नीरज आत्राम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. समाज व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलतर्फे या
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.आमदार साजिद खान पठाण,मान.आमदार धिरज लिंगाडे, यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेस सेल अध्यक्ष प्रकाश सोनवणे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश तायडे,महेंद्र गवई अध्यक्ष अकोला महानगर काँग्रेस कमिटी, सत्यनारायण घाटोळ तालुका अध्यक्ष बाळापूर, दीपक पोहरे महासचिव, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप शेवलकार अकोला, प्रा.डॉ.नितीन देऊळकार सरचिटणीस महानगर काँग्रेस कमिटी अकोला, अमित बोबडे उपाध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल, सचिन दुर्गाडे उपाध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल, स्वप्निल पाठक, दीपक पाटील आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडला.हा पुरस्काराचा सन्मान सोहळा १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वयंभू महादेव रिसॉर्ट, अंत्री मलकापूर, ता. बाळापूर, जि.अकोला येथे
नीरज आत्राम यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आनंद निकेतन महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचेवर अभिनंदनाचे वर्षाव होत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.