Home Breaking News • गणेश मंडळांचा सामाजिक दायित्वाचा आदर्श उपक्रम; वरोऱ्यात वार्डनिहाय आरोग्य तपासणी शिबिरे...

• गणेश मंडळांचा सामाजिक दायित्वाचा आदर्श उपक्रम; वरोऱ्यात वार्डनिहाय आरोग्य तपासणी शिबिरे • श्री. गणेशा आरोग्याचा,नगराध्यक्ष नगरसेवकांचा अभिनव उपक्रम.

4
Oplus_131072

• गणेश मंडळांचा सामाजिक दायित्वाचा आदर्श उपक्रम; वरोऱ्यात वार्डनिहाय आरोग्य तपासणी शिबिरे

• श्री. गणेशा आरोग्याचा,नगराध्यक्ष नगरसेवकांचा अभिनव उपक्रम.

वरोरा : गणेशोत्सव म्हटले की विविध स्पर्धा, गड-किल्ले, आकर्षक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र यावर्षी वरोरा शहरातील अनेक गणेश मंडळांनी उत्सवाला सामाजिक दायित्वाची जोड देत वार्डातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून एक नवीन संकल्पना उभी केली आहे.

लोकमान्य टिळक गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ, चिंतामणी गणेश मंडळ, विराट गणेश मंडळ यांसह शहरातील विविध गणेश मंडळांनी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

विघ्नहर्ता गणेश मंडळ टिळक वार्ड
वरोरा येथील नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळांनी केवळ देखावे, स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता वार्डातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे जनसामान्य गरजू व्यक्तीपर्यंत ही मदत पोहोचल्यास नक्कीच समाजाचे आरोग्य चांगले होईल.

या आरोग्य शिबिरांमध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदाना केले असून,बीपी, शुगर तसेच सामान्य रक्त तपासणी करण्यात येत आहे, आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप केले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.

या उपक्रमाबद्दल नागरिकांनी गणेश मंडळांचे आभार व्यक्त केले असून, सामाजिक संस्थांसह विविध मंडळांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.

मोरया गणेश मंडळ वरोरा या उपक्रमात लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधाकर कुंकुले, विघ्नहर्ता गणेश मंडळाचे ओम वरभे आणि मोरया गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण कामडी यांनी वरोरा नगर परिषदेतर्फे आयोजित सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराला मोलाचे सहकार्य केले.

या सामाजिक उपक्रमाबद्दल वरोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे आणि मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.