Home Breaking News श्री चिंतामणी गणेश उत्सव समिती तर्फे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे...

श्री चिंतामणी गणेश उत्सव समिती तर्फे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन.

2

श्री चिंतामणी गणेश उत्सव समिती तर्फे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन.

वरोरा : श्री चिंतामणी गणेश उत्सव समिती, भिवदरे लेआऊट, वरोरा यांच्या वतीने रविवारी गणेश चतुर्थीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री चिंतामणी गणेश मंदिर, भिवदरे लेआऊट, वरोरा येथे आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हान अध्यक्षांनी केले आहे.

शिबिरासाठी डॉ. साहिल विजयाराव ठाकरे (जनरल फिजिशियन, B.A.M.S., M.D.-AM., CCH, CSVD) व डॉ. निखिल राजेंद्र वरघणे (जनरल फिजिशियन, B.A.M.S.) यांची उपस्थितीत शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विघ्नहर्ता पॅथॉलॉजी लॅबच्या वतीने फुल बॉडी चेकअपवर विशेष सवलत देण्यात आली असून, श्री दत्त मेडिकल स्टोअर्सच्या वतीने २४ तास सेवा उपलब्ध असल्याचे आयोजक चिंतामणी गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले .

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या आरोग्य व रक्तदान शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्यात आला, तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली,

चिंतामणी गणेश मंडळ , भिवधरे लेआउट , आझाद वार्ड समिती चे अध्यक्ष निखिल अम्बाडरे , रोशन वरघने सचिव, शरद पुरी ,गोलू ख़िरटकर व सदस्य व वार्डातील सर्व नागरिक उपस्थित होते.