आ. मा.वि.आनंदवनचा विद्यार्थी सुहास सागर बोढे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम
नागपूर विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत निवड
वरोरा :जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन 17 सप्टेंबर 2026 ला आनंद निकेतन महाविद्यालयाचे क्रीडांगणामध्ये करण्यात आले होते.आनंद माध्यमिक विद्यालय ,आनंदवन चा विद्यार्थी सुहास बोढे 17 वर्ष वयोगटाचे आतील आनंद माध्यमिक विद्यालय,आनंदवन चा एकमेव विद्यार्थ्याने मल्लखांब स्पर्धेत भाग घेतला. सुहासने मल्लखांब चे प्रात्यक्षिक प्रदर्शन केले आणि जिल्हा स्पर्धेत प्रथम आला.त्याची निवड नागपूर विभागीय स्तरावरील आयोजित मल्लखांब स्पर्धेत निवड झाली असून विभागीय स्पर्धेचे आयोजन 3 व 4 ऑक्टोबर ला नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,अभ्यंकर नगर येथे करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या सुहास याचे नववी पर्यंत शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालय मध्ये झाले त्यानंतर 2026 आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे वर्ग दहावीत शिक्षणप्रवाहात आहे.आनंद निकेतन महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा.तानाजी बायस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सुहास मल्लखांब प्रशिक्षणाचे धडे घेत आहे.आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,प्रशिक्षक प्रा. तानाजी बायस्कर,मुख्याध्यापिका विद्या गोखरे व सर्व शिक्षकवृंदाना दिले आहे.







