Home Breaking News माढेळी व आषी येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल.

माढेळी व आषी येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल.

4
Oplus_131072

माढेळी व आषी येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल.

वरोरा | दि. १९ सप्टेंबर २०२६ : वरोरा तालुक्यातील माढेळी व आषी येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ४८ नग देशी दारूच्या बाटल्या, किंमत १ हजार ९२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

माढेळी येथील कारवाई :
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माढेळी येथील पंढरी बापुराव ढाले (वय ६५, रा. माढेळी, ता. वरोरा) यांच्या पानठेल्यावर पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी काउंटरखाली एका कापडी थैलीमध्ये ९२० रुपये किमतीच्या २३ नग राकेट देशी दारू संत्रा, प्रत्येकी ९० मिली क्षमतेच्या कंपनी सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आषी येथेही अवैध दारू जप्त :
तसेच दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी आषी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी शरद चंपत परचाके (वय ४८, रा. आषी, ता. वरोरा) यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली. घरातील बेडरूममध्ये एका कापडी थैलीत १ हजार रुपये किमतीच्या २५ नग राकेट देशी दारू संत्रा, प्रत्येकी ९० मिली क्षमतेच्या कंपनी सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या.

दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ हजार ९२० रुपये आहे.

विनापरवाना इतकी दारू कोणत्या दुकानातून विकत घेतली आणि ती विनापरवाना बिनधास्तपणे दिली गेली हे मात्र अजूनही माहित झाले नाही.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माढेळी येथील कारवाई पोलीस अंमलदार अरविंद कुंभे (ब.नं. ५७२) यांच्या फिर्यादीवरून, तर आषी येथील कारवाई पोलीस हवालदार नंदकिशोर खनके (ब.नं. ०७) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलीस अंमलदार रोशन तामसेटवार (ब.नं. २७५८) यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.