Home Breaking News मोदीजी नमस्कार… पत्रास कारण की..!

मोदीजी नमस्कार… पत्रास कारण की..!

152

खामगाव: राष्ट्रवादी युवक काँग्रेस खामगाव तालुका व शहर तर्फे एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
सर्व घटकांचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अविश्रांत वाटचाल सुरू आहे १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा मेहबूब शेख साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भरातून एक कोटी पत्र पाठविण्यात येणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदींना पत्र पाठविण्याच्या मोहिमेला वर्धापन दिनानिमित्तने सुरुवात करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस खामगाव तालुका व शहरच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे या विनंतीचे पत्र पाठविण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता अध्यक्ष भगवान लाहुडकार वशहरअध्यक्ष आकाश खारपाळे, दिलीप पाटील, विजय कुकरेजा, मिर्झा अक्रम बेग, राजेंद्र वराडे, अरविंद चव्हाण, अक्षय मोठे, सुरज थोरात, सुमित ठाकरे, आनंद ठाकरे, सय्यद सुलतान, रईस पैलवान, शेख राजीक, शेख इस्माईल, इस्रायल शहा,आनंद तायडे, योगेश चोपडे, दिनेश जांबे, दिपक शिंदे, निखिल अतकरे, ओम शेटे, यांचीं उपस्थिति होती.