Home Breaking News मोबाईल स्नॅचिंगमुळे आणखी एका महिलेचा गेला जीव

मोबाईल स्नॅचिंगमुळे आणखी एका महिलेचा गेला जीव

90

 

ठाणे : कनमिला रायसिंग नावाची 27 वर्षीय महिला बुधवारी आपल्या एका महिला मैत्रिणीसह ऑटोने जात होती, तेव्हा अचानक बाजुने दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी तिचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. झटपट होऊन कानमिला चलत्या ऑटो वरुन खाली पडली आणि तिला दवाखान्यात नेण्यात आले, तिची महिला मित्र तिला रुग्णालयात घेऊन गेली पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वीच पोलिस स्टेशनमध्ये अशीच आणखी एक घटना घडली होती, ज्यामध्ये रेल्वेमध्ये प्रवास करणार्‍या विद्या पाटील यांना मोबाईल खेचण्याच्या प्रयत्नात चोरट्याने खेचत नेले आणि विद्या पाटील चालत्या ट्रेनमधून खाली पडुन मरण पावली.

केवळ दहा ते पंधरा दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे. महिला स्नॅचिंगमुळे मरण पावली आहेत, ही अत्यंत धक्कादायक घटनाआहे.