Home Breaking News धक्कादायक! मुलाऐवजी मुलीची नोंद; सात वर्षांनंतर प्रकार उघडकीस!!

धक्कादायक! मुलाऐवजी मुलीची नोंद; सात वर्षांनंतर प्रकार उघडकीस!!

90

बुलढाणा (खामगाव) : प्रसूतीसाठी महिलांना रुग्णालयात भरती केल्यानंतर मुलगा जन्माला आला असताना त्याची नोंद मुलगी अशी झाल्याचे प्रकार सध्या खूप गाजत आहे. अशाच प्रकारची घटना आता बुलढाणा जिल्यातील खामगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रसूतीसाठी भरती करण्यात आलेल्या एका महिलेला उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून तब्बल दोन वर्षांनी कागदपत्रांसह सुटी देण्यात आली आहे. या महिलेला मुलगा जन्माला आता. मात्र, त्याची नोंद मुलगी म्हणून करण्यात आली. चुकीची नोंद सुधारण्यासाठी मुलाच्या पालकांवर बऱ्याच अडचणींना सामोरे जाण्याची वेळ रुग्णालय प्रशासनाने आणली आहे. हा प्रकार तब्बल सात वर्षांनी समोर आला आहे.

प्रशासनाने कमालीचे मौन

११ जून २०१५ साली खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील हर्षा गणेश वरखेडे यांना प्रसूतीसाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनी या महिलेने मुलाला जन्म दिला. उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील चुकीच्या कारभारामुळे या दाम्पत्यांच्या आनंदावर दुःखाचा डोंगर कोसळले. मुलाच्या जन्मानंतर आनंदात असलेल्या वरखेडे कुटुंबाला आता कागदोपत्री कामाचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र, उपजिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने याबाबत कमालीचे मौन बाळगले आहे.

रुग्णालयात घोळ
यापूर्वी खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, नेवासा तालुक्यातील वरखेड, नांदुरा तालुक्यातील नरखेड या गावातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातही काहीसा असाच प्रकार तब्बल सात वर्षांनी उघडकीस आला आहे. महिलेला मुलगा जन्माला आला असताना मुलगी म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र, दाम्पत्यांना नमुना १ प्रमाणे मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र दिले. आता वरखेडे कुटुंबीयांनी मुलाचा शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी तसेच जन्माचा दाखला दुरुस्त करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुलाऐवजी मुलीची नोंद!

हर्षा गणेश वरखेडे यांनी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मुलाला जन्म दिला. तत्कालीन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. काळपांडे यांनी त्यांची प्रसूती केली. रुग्णालयातून सुटीचा दाखला देणाऱ्या संबंधितांकडून जन्माच्या प्रमाणपत्रावर मुलगी जन्माला आल्याची नोंद इंग्रजी आणि मराठीत करण्यात आली.