Home विदर्भ लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांची पुण्य़तिथी दिनी भाजपा कार्यालयात अभिवादन !

लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांची पुण्य़तिथी दिनी भाजपा कार्यालयात अभिवादन !

63

खामगाव – आज दिनांक ३१/५/२२ रोजी शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्व्.भाऊसाहेब फुंडकर यांचे पुण्य़तिथी दिनीच शेतकरी सन्मान योजनेचा निधीचे 2000 रु शेतकऱ्यांच्या खात्यात मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वितरीत केले त्यामुळे आर्थीक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर आर्थीक मदत झाली आहे. अशा या लोकनेत्याच्या पुण्य़तिथी दिनी भाजपा कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष मा.आमदार आकाश दादा फूंडकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे भाऊसाहेब फुंडकर अमर रहे च्या घोषणा दिल्या. स्व़.भाऊसाहेबांच्या आठवणीने अनेक कार्यकर्ते गहिवरुन गेले होते. यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पार्पण करुन स्व.भाऊसाहेबांना अभिवादन केले.
*पुण्यश्लोक वंदनीय अहिल्यादेवी होळकर यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी*
संपुर्ण देशात असे एकही महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नाही की जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरे बांधली नाहीत अथवा त्यांचा जीर्णोद्धार केला नाही. त्या मोठया शिवभक्त होत्या त्यांनी मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी यांनी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला.
सोमनाथापासून ते काशी विश्वेश्वरांपर्यंतची हिंदूंच्या आस्थेची पवित्र धार्मिकस्थळें परकीय आक्रतांनी तोडली होती ती पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुढाकाराने उभी राहिली अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त विन्रम अभिवादन, असे प्रतिपादन आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील पुष्पार्पण करुन अभिवादन केले.

भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गरीब कल्याण परिषदेचे प्रसारण

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा गरीब कल्याण परिषद शिमला येथे आयोजित करण्यात आली होती. भाजपा कार्यालय खामगांव येथे मोठी स्क्रीन लाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी मा.पंतप्रधानांचे मार्गदर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर, भाजपाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, डॉ एकनाथ पाटील, अनिताताई देशपांडे, शिवानीताई कुळकर्णी, जान्हवीताई कुळकर्णी, राजेंद्र धनोकार, राकेश राणा, राम मिश्रा,गणेश जाधव, संजय शर्मा, शैलेश सोले, गजानन मुळीक, सत्यनारायण थानवी, जितेंद्र पुरोहित, शुभम देशमुख, पवन डिक्क़र, रवि गायगोळ पाटील, अजय खोद्रे, विक्की रेठेकर, रोहन जैस्वाल, विक्की हटटेल, राम शिंदे, हितेश पदमगिरवार, संदिप राजपूत, सोनु नेभवाणी, प्रसन्ऩ पिसे,पवन राठोड, संजू गुप्ता, नितीन पोकळे, शामराव पडवाळ, मोहन महाराज क्ष‍िरसागर,राजेश शर्मा (डॉन) प्रमोद भोरे, मनोहर फाळके, विजयभाऊ देशमुख, दिपक वाघ्, गणेश बाठे,सतिष जाधव,आशिष सुरेका, गजानन मुळीक,श्रीकृष्ण़ उगले, प्रविण धिरडे, रघुनाथ खेरडे, शिवाभाऊ लोखंडकार, विजय महाले, भगवानसिंग सोळंके,गजानन अरवाडे यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थ‍ित होते.