Home Breaking News चोरट्यांनी देवालाही नाही सोडलं ; सोमनाथ महाराज संस्थानची दानपेटी फोडली ;सर्व...

चोरट्यांनी देवालाही नाही सोडलं ; सोमनाथ महाराज संस्थानची दानपेटी फोडली ;सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

159

चिखली :  तालुक्यातील डोंगरशेवली येथील पुरातन असलेले सोमनाथ महाराज संस्थान मंदिरातील दानपेटी दोन अज्ञात्यांनी फोडल्याची घटना 1 जून रोजी घडली. यात चोरट्यानी जवळ जवळ 40 हजाराची रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील डोंगरशेवली येथे पुरातन महादेवाचे मंदिर असून याठिकाणी पंचक्रोशीतील भक्तांची मांदिआळी असते. या ठिकाणी जिल्हाभरातून भक्तगण येत असल्याने दान देणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

हे सर्व हेरून चोरट्यानी मध्यरात्रीचा फायदा घेऊन मंदिरातील दान फेटी फोडून रोकड लंपास केली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सदर प्रकरणाचा तपास आमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे.

या अगोदर देखील या मंदिरावर चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या आहे.
परंतु या अगोदर चोरीच्या घटना घडल्या असताना देखील मंदिर प्रशासनाला जाग आलेली दिसून येत नाही.

अश्या चोरीच्या घटना घडू नये यासाठी कोणत्याही प्रकारची उपाय योजना मंदिर प्रशासनाला करता आल्या नाही. या निमित्ताने मंदिर प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

चोरट्यानी ज्या ठिकाणी दानपेटी फोडली त्या ठिकाणी गेट बसवले आहे. परंतु हे गेट कायम उगडेच असते याचा फायदा घेऊन चोरट्यानी दानपेटी फोडून नेली. आता तरी यातून मंदिर प्रशासन बोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी उपाय योजना करेल ऐवडीच अपेक्षा.