Home राजकारण युवा सेनेच्या तालुकाप्रमुखपदी उमेश शेळके; युवकांमध्ये नवचैतन्य: तालुक्यात युवा संघटन वाढणार !

युवा सेनेच्या तालुकाप्रमुखपदी उमेश शेळके; युवकांमध्ये नवचैतन्य: तालुक्यात युवा संघटन वाढणार !

163

शेगाव- शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी घाटाखालील संघटन बांधणीवर जोर दिला असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून युवा सेनेचे तालुका प्रमुखपदी तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले उमेश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश शेळके यांचा शेगाव तालुक्यात तरुणांमध्ये चांगला संपर्क असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून तालुक्यात आता युवा सेनेचे संघटन मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

खासदार प्रतापराव जाधव साहेब हे केशेगाव दौऱ्यावर होती त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन नियुक्त्या जाहीर केले आहेत शेगाव तालुक्यात युवा सेनेची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची होती. सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम भाऊ दाणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे यांनी या शिवसेना तालुकाप्रमुख पदाकरिता उमेश शेळके यांच्या नावाची खासदार जाधव यांच्याकडे शिफारस केली असता त्यांनी लगेच ही निवृत्ती जाहीर केली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत युवा सेना तालुका प्रमुख शेगावपदी उमेश अशोकराव शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवा सेना कार्यकर्ते अजय कोकाटे, शिवसेना शाखाप्रमुख विठ्ठल भामद्रे, दत्ता खेडकर, ऋषिकेश तराळे नीतू पाटील, शेळके नितीन बर्डे, सचिन बाठे, संतोष कुसुंबे, सागर थारकर अमोल शेळके, निलेश भारसाकळे व इतर शिवसैनिक युवा सेना कार्यकर्ते उपस्थित होते तसेच प्रताप रावजी जाधव साहेब यांनी उमेश शेळके युवासेना अध्यक्ष यांना येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची संदर्भात मोलाची जबाबदारी दिली

संघटन मजबूत करणार – उमेश शेळके

पक्षश्रेष्ठींनी मला युवा सेनेच्या शेगाव तालुका प्रमुख पदाची मोठी जबाबदारी दिली असून त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. शेगाव तालुक्यातील गावागावात युवासेनेचे संघटन मजबूत करणार आहे. घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया नवनियुक्त युवा सेना तालुका प्रमुख उमेश शेळके यांनी ‘द रिपब्लिक’ शी बोलताना दिली आहे