Home Breaking News विप्र नारी शक्ती सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सौ.कविता शर्मा

विप्र नारी शक्ती सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सौ.कविता शर्मा

97

 

पुणे विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली

शेगाव : (प्रतिनिधी) विप्र नारी शक्ती सेवा संस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करताना राष्ट्रीय अध्यक्षा सौ.गौरी जी शर्मा, राष्ट्रीय प्रभारी शरद मिश्रा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्या संमतीने सौ.कविता शर्मा यांनी केलेल्या सेवा कार्याबद्दल व संस्थेवरील निष्ठेची दखल घेत त्यांची पुणे विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कविता शर्मा ह्या शेगाव येथील रामेश्वर शर्मा यांची मुलगी असून तिने पुण्यात आपल्या कर्तबगिरीचा झेंडा रोवला आहे.
रामेश्र्वर मुक्तीलालजी शर्मा शेगांव यांची मुलगी सौ.कविता किरण शर्मा हि नांदुरा येथील मधुकर शर्मा यांची सून असून त्या सध्या पुणे येथे स्थायिक झालेल्या आहेत. यावेळी त्यांनी ब्राम्हण समाज हितासाठी कार्य करणाऱ्या विप्र नारी शक्ती सेवा संस्थे अंतर्गत भरीव कार्य केल्याने राष्ट्रीय अध्यक्ष सौ.गौरी शर्मा यांनी पुणे विभाग अध्यक्षपदावर त्यांची निवड केली. त्यांच्या ह्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.