Home क्राईम अल्पवयीन मुलीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन, सामूहिक अत्याचार !

अल्पवयीन मुलीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन, सामूहिक अत्याचार !

86

अमरावती : महिला, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय बनत चालत आहे. रोज एक तरी अत्याचाराची घटना वाचनात येते. अशाच एका माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे तसेच या घटनेची सर्वस्तरांतून निंदा होते असून नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे.

एक अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या गावी गेली असताना तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची काळीज हादरून टाकणारी ही घटना आहे .अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १२ जूनच्या रात्रीला तिला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर आरोपींनी चारचाकीमध्ये पीडितेच्या अब्रुचे लचके तोडले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. महिला अत्याचाराविरोधात कठोर पाऊलं उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहेत. अशातच अमरावतीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीत अल्पवयीन मुली तसेच महिला अद्यापही सुरक्षित नसल्याचं, पुन्हा एकदा पुढे आलं आहे.

दरम्यान, या घटनेनं पीडित मुलगी प्रचंड घाबरली. भेदरलेल्या परिस्थितीत तिने परतवाडा पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोन नराधमांना अटक देखील करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.