Home कृषी Rajura @city news मेघा धोटेंचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज...

Rajura @city news मेघा धोटेंचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज पळविला ! राजूरातील घटना -पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल,श्वान पथकालाही केले पाचारण !

157

Rajura @city news

मेघा धोटेंचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज पळविला !

राजूरातील घटना -पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल,श्वान पथकालाही केले पाचारण !

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपूर : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका,जेष्ठ साहित्यिका तथा राजू-यातील शिक्षिका मेघा रामकृष्ण धोटे यांचे राजूरा येथील घर फोडून चोरट्यांनी दहा तोळे सोने व त्रेपन हजार रुपये लंपास केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.

या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि राजूरा निवासी मेघा धोटे ह्या आपल्या मुलांबाळांसह दिवाळीच्या निमित्ताने भद्रावतीला दोन दिवसांपूर्वी गेल्या होत्या.

आज त्या भद्रावतीवरुन सकाळी शनिवारला ११वाजता आपल्या राजूरा स्वगावी परतल्यावर त्यांना आपले घर चोरट्यांनी फोडल्याची बाब उघडकीस आली.

लगेच या बाबत मेघा धोटे यांनी राजूरा पोलिस स्टेशनला कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठून घराची पाहणी केली व पंचनामा केला.

दरम्यान अधिवक्ता मेघा धोटे यांनी संबंधित पोलिस स्टेशनला रिपोर्ट दाखल केली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असल्याचे समजते .

या घटनेतील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर वरुन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी घर फोडले असावे असा एक अंदाज असून राजू-यातील रात्रीची पोलिस गस्त वाढविणे फार आवश्यक व गरजेचे झाले आहे.सदरहु घरफोडीतील राजूरा पोलिस पथक शोध घेत आहे.

हे वृत्त लिही पर्यंत पोलिसांना चोरटे गवसले नव्हते .या अगोदर भद्रावती येथील सहज सुचलंच्या जेष्ठ सदस्या रजनी रणदिवे यांची बैग चोरट्यांनी सिर्सी बसस्थानकावरुन लंपास केली होती .त्यात चार लाख रुपयांचे सोने होते .हे चोरटे शोधण्यात पोलिसांना अद्याप यश प्राप्त झाले नाही.