Home Breaking News Ballarpur @city news अब्दुल करीम यांची शहर काँग्रेस कमिटीच्या बल्लारपूर अध्यक्षपदी फेरनिवड

Ballarpur @city news अब्दुल करीम यांची शहर काँग्रेस कमिटीच्या बल्लारपूर अध्यक्षपदी फेरनिवड

179

Ballarpur @city news

अब्दुल करीम यांची शहर काँग्रेस कमिटीच्या बल्लारपूर अध्यक्षपदी फेरनिवड

सुवर्ण महाराष्ट्र:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यात नियुक्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या आदेशान्वये बल्लारपूर शहर अध्यक्षपदी अब्दुल करीम शेख यांची, तर ग्रामीण अध्यक्षपदी गोविंद उपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे. अध्यक्ष पदाची जबाबदारी करीम यांना सलग दुसऱ्यांदा मिळाली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, रजनी हजारे, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, व्यंकटेश बालबहिरय्या यांनी अभिनंदन केले आहे.