Home क्राईम Ballarpur@ taluka news •उमेश वाढई यांची वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर च्या...

Ballarpur@ taluka news •उमेश वाढई यांची वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर च्या तालुकाध्यक्ष पदावर निवड

141

Ballarpur@ taluka news

•उमेश वाढई यांची वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर च्या तालुकाध्यक्ष पदावर निवड

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपूर- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय संस्थापक व अध्यक्ष एड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व वंचित आघाडी चे चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेश बोरकर व वंचित बहुजन आघाडी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांच्या सुचने नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या मध्ये वंचित बहुजन आघाडी च्या बल्लारपूर तालुकाध्यक्ष पदावर उमेश वाढई यांची निवड करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे विशाल डुंबरे यांची तालुका उपाध्यक्ष, तर एड. प्रविण जागणे यांची तालुका महासचिव पदावर निवड करण्यात आली आहे.

उमेश वाढई यांनी मागील नवीन दहेली ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित च्या चार जागा लढवून दोन सदस्य निवडून आणून बल्लारपूर तालुक्यात प्रथमता वंचित बहुजन आघाडी चे तोरण बांधण्याचा मान त्यांना च जातो तसेच ते तीन वर्षापासून वंचित मध्ये कार्यरत असून त्यांचा कामाची दखल घेऊन त्यांची वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असे त्यांचे मार्गदर्शक , सिद्धार्थ शंभरकर , ओम रायपुरे, धीरज बांबोडे व सहकारी मित्र, नवनियुक्त वंचित चे सदस्य संदीप निरंजने, अंकुश जिवणे, अतुल पावडे,राहुल रामटेके , सचिन रामटेके यांनी तालुका प्रतिनिधी बोलताना सांगितले.