Home क्राईम Ballarpur @city news छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही ...

Ballarpur @city news छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही राज्यपालांनी महाराष्ट्राची तात्काळ माफी मागावी:राजू झोडे

174

Ballarpur @city news

● छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही

● राज्यपालांनी महाराष्ट्राची तात्काळ माफी मागावी:राजू झोडे

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहे.त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, राज्यपालांनी महाराष्ट्राची तात्काळ माफी मागावी व शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही.

राज्यपालांनी महाराष्ट्राची तात्काळ माफी मागावी व शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.