Home Breaking News Ballarpur@ city news raktdan shibir एच.डी.एफ.सी.बैक व शाहिद अब्दुल हमीद चौक...

Ballarpur@ city news raktdan shibir एच.डी.एफ.सी.बैक व शाहिद अब्दुल हमीद चौक बल्लारपुर तर्फे भारतीय संविधान दिना निमित्य रक्तदान शिबिर

136

Ballarpur@ city news raktdan shibir

■ एच.डी.एफ.सी.बैक व शाहिद अब्दुल हमीद चौक बल्लारपुर तर्फे भारतीय संविधान दिना निमित्य रक्तदान शिबिर

सुवर्ण भारत:पारीश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर

बल्लारपुर:भारतीय संविधान दिनानिमित्त एचडीएफसी बँक शाखा राजूरा तथा शहीद अब्दुल हमीद चौक मित्रपरिवार बल्लारपूर तर्फे भारतीय संविधान दिन तसेच रक्तदान शिबिर आयोजित केले होते .

या प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ अभिलाषा गावतुरे (बालरोग तदन्य चंद्रपुर) , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ कुलभूषण मोरे (संचालक अर्थ फाउंडेशन) गड्चान्दुर , प्रमुख अतिथि डॉ दिलीप मडावी बल्लारपुर, डॉ मधुकर बावने बल्लारपुर , डॉ नन्दा शेंडे , आयोजक राजेश कोदाटे (अधिकारी HDFC बैंक शाखा राजुरा उपस्थित होते .

या प्रसंगी डॉ अभिलाषा गावतुरे यानी सद्यास्थितित संविधानाचे महत्व यावर मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष डॉ कुलभूषण मोरे यानी रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि रक्तदान चे महत्व या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे आयोजन राजेश कोदाटे (अधिकारी HDFC बैंक शाखा राजुरा ) आणि कन्नमवार वार्ड शहीद अब्दुल हमीद चोक मित्र परिवार बल्लारपुर यानी केले . या शिबिरात ६१ रक्तदात्यानी रक्तदान केले आणि उत्स्फूर्त सहभाग घेतला