Home Breaking News Varora taluka@ news नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर

Varora taluka@ news नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर

205

Varora taluka@ news

■ नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा:वरोरा तालुक्यातील नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते जिशान पठाण , सुजित लोंढे, सूरज धात्रक,आकाश घुबडे , ओबेद पठाण, मिथुन कुडे, रंजीत हीवरकर मिञ परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ३५ रक्तदात्यानी सामजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले. रक्त बनविण्याची मशीन अजून तयार झाली नाही मानवाचे रक्त च मानवाला दिले जाऊ शकते त्यामुळे सर्वांना व जास्त करुन युवकांना रक्तदान करणे गरजेचे आहे.

यावेळी अभिजीत प्रभाकरराव कुडे ( नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष) , शुभम हीवरकर ( सचिव ,नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना) , साहिल पानतावणे, शबिर पठाण, मंजू शेख, गुणवंत पचारे, शिवा लोंढे, शुभाष चौधरी, सूरज बावणे, सुमित राऊत व मोठया संख्येने युवक उपस्थित होते.