Home Breaking News Varora taluka@ news राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष ला अटक व तीन दिवसाची...

Varora taluka@ news राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष ला अटक व तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ.

332

Varora taluka@ news

■ राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष ला अटक व तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी.

■ चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ.

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

वरोरा:वरोरा तालुक्यातील वयोवृद्ध व्यक्तीवर खुनी हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वरोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उर्फ चिरकुटा गोपाळ डेंगळे यांचे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाजत असून अनेक शेतकऱ्यांची त्यांनी शेतजमीन मध्ये आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

अशाच एका शेतीच्या वादातून अमृत पांडुरंग आगलावे वय 61 वर्ष राहणार टेंमुर्डा येथील वयोवृद्ध शेतकऱ्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीने प्राण घातक खुनी हल्ला केला होता यात आगलावे हे गंभीर जखमी झाले होते व त्यांना चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते व तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होता.

त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी अविनाश उर्फ चिरकुटा डेंगळे यांना वरोरा पोलिसांनी अटक करून पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे.