Home Breaking News Ballarpur city @news बल्लारपुर शहरातील रोहित कटकमवार केटरिंग व्यवसायिक केली आत्महत्या

Ballarpur city @news बल्लारपुर शहरातील रोहित कटकमवार केटरिंग व्यवसायिक केली आत्महत्या

580

Ballarpur city @news

■ बल्लारपुर शहरातील रोहित कटकमवार केटरिंग व्यवसायिक केली आत्महत्या

सुवर्ण भारत:पारीश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर : गोंडवाना विसापूर रेल्वे हॉल्ट स्टेशन हद्दीत अप लाईन पोल क्रमांक ८८५/२९ आयबीएस(सिग्नल) च्या पूर्वी रेल्वे विहिरी जवळ रोहित सुधाकर कटकमवार (२६) रा. हनुमान मंदिर जवळ बल्लारपूर या युवकाने शनिवार रात्री ८-२५ सुमारास बल्लारशाह कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या मालगाडी समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये रेल्वेचा चाक डोक्यावरून गेल्याने त्याचे शिश (डोके) छिन्न – विच्छिन्न होऊन रक्ताचा सडा रेल्वे ट्रकवर पडला होता.

स्थानिक नागरिकांच्या मते एक अनोळखी युवक साडेसातच्या सुमारात गोंडवाना विसापूर हॉल्ट स्टेशन जवळ दुचाकीने आला व तेथे असलेल्या प्रवासी आसनावर जाऊन बसला होता व आपल्यात विचारांमध्ये मग्न असतानाच तो अचानक बल्लारशाह कडून चंद्रपूरकडे जाणारी मालगाडी जवळ येत असतानी पाहून त्याने आपले डोके रेल्वे ट्रकवर ठेवले व क्षणाचाही विलंब न होता त्याचे डोके छिन्न -विच्छिन्न झाले व रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता ही माहिती स्थानिक पोलिसांना कळताच मु.ह. घनश्याम साखरकर यांनी वरिष्ठांना माहिती कळवली तेंव्हा रेल्वे पोलीसचे एएसआय प्रकाश लाडस्कर आपल्या स्टॉपसह घटनास्थळावर दाखल झाले होते.

मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना मृताचे नातेवाईक त्याचा शोध घेत तिथे आले होते. त्याची ओळख पटवन्यात आल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर नेण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार सदर युवक केटरिंगचे व्यवसाय करत होता अशी माहिती वृत्त हाती लागले तेव्हा मिळाली होती.