Home Breaking News Wardha dist@ news समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांनी...

Wardha dist@ news समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांनी केले 46वेळा रक्तदान

158

Wardha dist@ news

समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांनी केले 46वेळा रक्तदान

सुवर्ण भारत:अर्पित वाहने
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

वर्धा: रक्तदान हेच जिवनदान या भावनेतून समता सैनिक दल वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांनी रक्तदान करून रुग्णाला जीवनदान दिले.

स्थानिक कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम रुग्ण हिना शेख रा.वर्धा यांना A+ve रक्त गटाची आवश्यकता आहे असे कळताच समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख यांनी थेट रुग्णालयात जाऊन गरजवंत रुग्णाला ताबडतोब रक्तदान केले.

प्रदीपजी कांबळे हे समता सैनिक दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत.जिल्ह्यात समता सैनिक दल वाढविण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दर तीन महिन्याला रुग्णालयात जाऊन ते गरजवंत रुग्णांना रक्तदान करतात. त्यांनी आतापर्यंत 46 वेळा रक्तदान केले आहे.अडचणीत सापडलेल्र्या रुगणांना
ताबडतोब मदत पोहचविण्यास तत्पर असल्यामुळे ते संपूर्ण जिल्ह्यात रुग्णमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.

रक्तदान केल्याबद्दल रुगणांच्या नातेवाईकांनी व डॉक्टारांनी त्यांचे आभार मानले.प्रत्येकांनी एकदा तरी रक्तदान करावे असे त्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले.

यावेळी त्यांच्या सोबत ,अभय कुंभारे,मनोज थुल आदी उपस्थित होते.