Home क्राईम Chandrapur dist@ news डॉ.बालपांडे यांनी दिला अपघात ग्रस्त महिलेला मदतीचा हात…!

Chandrapur dist@ news डॉ.बालपांडे यांनी दिला अपघात ग्रस्त महिलेला मदतीचा हात…!

142

Chandrapur dist@ news

■ डॉ.बालपांडे यांनी दिला
अपघात ग्रस्त महिलेला मदतीचा हात…!

सुवर्ण भारत: किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपुर:चंद्रपूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती रुई येथील निरुपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.गोकुलदास बालपांडे यांनी रनमोचन येथील योगिता विनोद दोनाडकर यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे तब्येतीची सहानुभूतीने विचारपूस करीत त्यांनी अपघातातील त्या जखमी महिलेला आर्थिक मदतीचा हात दिला.

गेल्या काही दिवसांपूर्वी रणमोचन गावातील दोनाडकर परिवार व त्यांची काही नातेवाईक मंडळी लाखांदूर तालुक्यातील भागडी या गावात एका नामकरण विधीच्या कार्यक्रमाला मालवाहक मिनीडोरने जात होते. अचानकपणे ब्रह्मपुरीच्या टिळक नगर येथील मुख्य रस्त्यावर मिनीडोर पलटी होऊन त्या ठिकाणी अपघात घडला होता.

या अपघातात बऱ्याच महिला व लहान मुलांचा समावेश होता. तदवतंच या अपघातात काही जण गंभीर जखमी देखिल झाले होते. घटनेतील जखमींना तातडीने ब्रह्मपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार्थ भरती करण्यात आले होते .प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना खाजगी दवाखान्यात तर काही गंभीर जखमी (महिलांना )गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या अपघातात योगिता विनोद दोनाडकर या महिलेला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती .गडचिरोलीतील उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

गंभीर प्रकारची दुखापत असल्या कारणाने ब्रह्मपुरी येथील पेशेट्टीवार रुग्णालयात त्यांचेवर नंतर उपचार करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत या महिलेवर चौगान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही फार दयनीय असल्याचे लक्षात येताच डॉ. जी.एम .बालपांडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत रणमोचन येथे जाऊन जखमी योगिता विनोद दोनाडकर यांच्या कुटुंबीयांची सहानुभूतीने विचारपूस केली व त्यांना आर्थिक मदत दिली. दोनाडकर कुटुंबियाने देखिल त्यांचे आभार मानले आहेत.