Chandrapur @city news
• संप मागे -कर्मचारी कामावर..!
सुवर्ण भारत:किरण घाटे (मुख्य संपादक)
चंद्रपुर;१४मार्च पासून आपल्या न्याय व रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे २०हजार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता .काल सोमवारला आश्वासना नंतर हा संप मागे घेण्यात आला. आज मंगळवार दि.२१मार्चला चंद्रपूर जिल्ह्यातील संपात सहभागी झालेले बहुतेक सर्वच विभागाचे कर्मचारी कामावर रुजू झाल्याचे वृत्त आहे.गेल्या सात दिवस चाललेल्या या संपामुळे जिल्ह्यातील पूर्णतः शासकीय कामकाज ठप्प पडले होते.जुनी पेंशनची मागणी शासनाने मंजूर करावी या प्रमुख मागणीसाठी सरकारी , निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने हा राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला होता.
