Home Breaking News • कविता अनामिक.. ! चंद्रपूर -संकलन रंज्जू मोडक

• कविता अनामिक.. ! चंद्रपूर -संकलन रंज्जू मोडक

478

• कविता अनामिक.. !

चंद्रपूर -संकलन रंज्जू मोडक

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

एक पक्षी नीरभ्र होतो, रात्रीच्या सावलीत उजेड होत आपुले पंख
पसरवितो उषेच्या किरणात
आकाश असते आंधळे, वेडे झालेले

गिरकी घेत मध्यावर प्रदक्षिणा घालीत गूढ पालवीच्या सुगंधात अनामिक होत उभा राहतो अथांग सागरात

उंच उंच पर्वत, उंच उंच टेकड्या आपुले अस्तित्व जपण्या साठी हवेत झेलतात
मग्रूर गिधाडांचे आवाज, एक नवीन रंग ओसंडोतो पहाटेच्या धुक्यातून

गंगेच्या ओघळणाऱ्या लहरीतून
अनामिक आनंद उधळीत किरणांचा प्रवास नव्याने घडतो
पहाटेच्या उषेला

हासडलेल्या शब्दांची काळरात्र पचवीत शुभ्र फेसांच्या गर्तेत उगवते हिरव्याकंच आनंदाची
पहाटप्रभा पंख शोधतात समुद्रातील शंख शिंपले आणि अधांतरी चाचपणाऱ्या अनामिक हातात सापडतो उदयाचा नवा सूर्य

प्रा. डॉ. वैशाली भांडारकर ,सहज सुचलं काव्य कुंज सदस्य
महिला कला महाविद्यालय, उमरेड जि.नागपूर
8380893706