bramhapuri@ taluka news
• ब्रह्मपुरी तालुक्यातील युवासेना पदाधिकारीची नियुक्ती..!
सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम (उपसंपादक)
ब्रम्हपुरी:शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,युवासेनाप्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार , युवासेना सचिव वरुण सरदेसाई,युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षलदादा काकडे,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांत कदम, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या सहकार्याने युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी तालुक्यातील युवासेना पदाधिकारीची शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे नियुक्ती करण्यात आली.
त्यावेळी यादव रामभाऊ रावेकर यांची युवासेना तालुका अधिकारी व कमर युनिस अली सैय्यद यांची युवासेना शहर अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली.
बाळासाहेबांच्या विचारला प्रेरित होऊन आदित्यसाहेब या युवा नेत्याच्या कार्यशिलतेवर विश्वास ठेऊन युवासेना पक्षात प्रवेश केला अशे व्यक्तव नवनियुक्त युवासेना पदाधिकारीनी म्हटले.
त्यावेळी मुकेश जिवतोडे व मनिष जेठानी यांनी नवनियुक्त पदाधिकारीचे पुषगुच्छ देऊन स्वागत करून पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले.
त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाजी दहिकर, जेष्ठ शिवसैनिक बंडुजी डाखरे, युवासेना शहर प्रमुख पियुष सिंग, संदीप रायपूरे परीक्षित कामडी,अतुल नांदे व समस्त पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.


