Rajura@ taluka news
• येत्या २५ मार्चला
पुरोगामी विचार मंच राजुराच्या वतीने व्याख्यान पर्वाचे आयोजन..!
सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)
राजुरा:शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगीकता या विषयावर व्याख्यानपर्वाचे आयोजन दि. 25 मार्च 2023 रोज शनिवारला धनोजे कुणबी सभागृह, राजुरा येथे सकाळी 11: 30 वाजता पुरोगामी विचार मंच, राजुरा द्वारा करण्यात आले आहे.
सदरहु व्याख्यानपर्वाचे प्रमुख मार्गदर्शक “दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा” या गाजलेल्या पुस्तकाचे छत्रपती संभाजी नगर येथील लेखक प्रा. प्रल्हाद लुलेकर हे आहेत.
उपरोक्त व्याख्यानमालेत मराठा सेवा संघ, नागवंश युथ फोर्स, भारतीय बौद्ध महासभा आणि महात्मा ज्योतिबा फुले (माळी) समाज सुधारक मंडळ, राजुरा आदीं संघटनाचा आयोजनात सहभाग आहे. या व्याख्यानपर्वाचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी एका पत्रकातून केले आहे.




