Chandrapur dist@ news
• पुरस्कार प्राप्त किरण साळवींचे कार्य वाखण्याजोगे व कौतुकास्पद:अंजू पिंपले.
सुवर्ण भारत:किरण घाटे (सह संपादक)
चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भद्रावती नगरीतील सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक तथा अध्यक्ष कु.किरण विजय साळवी यांचे कार्य खरोखरंच वाखण्याजोगे व कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरातील अंजू मुकेश पिंपले यांनी त्यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार व हिरकणी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आज बुधवारी या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलताना व्यक्त केली. उच्च शिक्षित कु.साळवी यांची व्हॅर्चुअस मल्टीपर्पज नावाची सोसायटी भद्रावती नगरीत कार्यरत असून ती संस्था दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करते .या शिवाय निराधार व विधवा महिलांना वेळोवेळी मदत करते.या पूर्वी देखील कु.किरण साळवी यांना त्यांच्या विशेष व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.




