Home Breaking News Chandrpur city@ news • संगीत स्पर्धेत ठरली आठ वर्षिय स्पृहा सागर...

Chandrpur city@ news • संगीत स्पर्धेत ठरली आठ वर्षिय स्पृहा सागर पाटील व्दितीय पुरस्काराची मानकरी ..! • सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, वर्षां कोंगरे, किरण साळवी ,दिक्षा तेली व गायत्री रणदिवेंसह अनेकांनी केले स्पृहाचे अभिनंदन..!

354

Chandrpur city@ news

• संगीत स्पर्धेत ठरली आठ वर्षिय स्पृहा सागर पाटील व्दितीय पुरस्काराची मानकरी ..!

• सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, वर्षां कोंगरे, किरण साळवी ,दिक्षा तेली व गायत्री रणदिवेंसह अनेकांनी केले स्पृहाचे अभिनंदन..!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: पद्मश्री सुरेश वाडकर संगीत अकादमीच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या संगीत स्पर्धेत विदर्भाच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील प्रा. सुनंदा पाटील यांची आठ वर्षिय नात कु. स्पृहा सागर पाटील ही व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे .

सध्या तिचे वास्तव्य मुंबईला आहे.स्पृहा ही स्थानिक पोदार इंटर नॅशनल स्कूल येथे इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकतेय ! या शिवाय ती कवी शांताराम नांदगावकर यांची स्नुषा सुहासिनी नांदगावकर यांचे कडे संगीताचे धडे घेत आहे .

संगीता सोबतच तिला चित्रकलेची अमाप आवड आहे .कु.स्पृहाला पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल शाळेतील शिक्षकवृदांसह अन्य मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे . दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे, हिरकणी पुरस्कार प्राप्त भद्रावतीच्या समाजसेविका कु.किरण साळवी , गायत्री रणदिवे,रश्मी पचारे, प्रियंका जगझाप ,कु.मंगल मिसाळ,दिक्षा दिनेश तेली, वंदना बरडे , सरीना शेख , संगिता पाटील, शैला चिमड्यालवार,कु.अर्चना सुतार ,मेघा मिलमिले,वर्षा आत्राम, प्रियंका डफ, शारदा झाडे, ज्योति इंगळे, वनिता उरकुडकर, रजनी सोयाम ,सिमा पाटील, सुवर्णा कुळमेथे, ज्योति मेहरकुरे, मंथना नन्नावरे ,अंजू पिंपले, रोशनी चिताडे,रुपाली शेरके चैताली आत्राम,जया पलसावार, मृणाल भगत, आदींनी स्पृहाचे तोंड भरून कौतुक व अभिनंदन केले आहे.