Home Breaking News Ballarpur city@ news • वासरू ला दिले जीवदान गौरक्षण वार्ड येथील...

Ballarpur city@ news • वासरू ला दिले जीवदान गौरक्षण वार्ड येथील घटना

538

Ballarpur city@ news

• वासरू ला दिले जीवदान गौरक्षण वार्ड येथील घटना

सुवर्ण भारत:परिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- शहरातील गौरक्षण वार्ड, पत्ता गोदाम जवळ मागील दोन दिवसापासून एक वासरू एकाच जागेवर झोपून होते. याची माहिती राज युवा ग्रुप चे अध्यक्ष नीरज झाडे यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्या सोबत त्या वासरू ला सावली मध्ये ठेवले. व लगेच पशू दवाखान्यात कॉल करून तेथील पशू वैद्यकीय अधिकारी ला माहिती दिली.
पशू वैद्यकीय अधिकारी आणि चमू ने येऊन त्या वासरू ची तपासणी करून इंजेक्शन व सलाईन लावले.या कामी राज युवा गृप चे अध्यक्ष नीरज झाडे, अरुण देवाळकर,राहुल फासलावार,राजेश बद्दीवार, मंगला काकी, बाळु खोब्रागडे, सिनु तनेरा, राहुल तनेरा, महेश मोंडी विशाल कुंभरे आदी ने सहकार्य करून एका वासरू ला जीवदान दिले.