Home Breaking News Ghugus city@ news • लाइट्स मेटल्स एण्ड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स...

Ghugus city@ news • लाइट्स मेटल्स एण्ड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फ़े फळ-भाजीपाला संरक्षण कूलिंग कार्ट वितरण

316

Ghugus city@ news

• लाइट्स मेटल्स एण्ड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फ़े फळ-भाजीपाला संरक्षण कूलिंग कार्ट वितरण

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथे फळ व भाजीपाला विक्रेत्यांना उष्णतेमुळे तसेच अतिवृष्टिमुळे त्रास सहन करून फळ व भाजीपालेचा किरकोळ व्यवसाय करावा लागतो व त्यात भर म्हणजे फळ व भाजीपाला हे हातगाडी मध्ये खुल्या अवस्थेत असल्यामुळे एक ते दोन दिवसानंतर खराब होतात. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागतो.

हे बाबी लक्षात घेता, लाइट्स मेटल्स एण्ड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फ़े फळ-भाजीपाला विक्रेत्यांना फळ-भाजीपाला संरक्षण कूलिंग कार्ट वितरण करण्यात आले. फळ-भाजीपाला संरक्षण कूलिंग कार्ट हे उर्वरित फळ भाजीपाला तापमानाच्या उद्रेकाने व पावसाने सुरक्षित करून खराब होण्यापासून सरंक्षण करते. या कुलिंग कार्टच्या साहाय्याने फळ व भाजीपाला हे ताजे देखील राहतात त्यामुळे फळ भाजीपाला विक्रेत्यांचा नुकसान कमी होण्यास मदद होते.