Home Breaking News Ballarpur city@ news •इंग्लिश मिडीयम कॉमर्स चा १००% निकाल

Ballarpur city@ news •इंग्लिश मिडीयम कॉमर्स चा १००% निकाल

450

Ballarpur city@ news

•इंग्लिश मिडीयम कॉमर्स चा १००% निकाल

बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इंग्लिश मिडीयम कॉमर्स 12 वी च्या 100 % निकाल लागला आहे.
आज दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (एचएससी) निकाल फेब्रुवारी-मार्च घेतलेल्या बारावीच्या निकाल आज जाहीर करण्यात आले. त्यात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इंग्लिश मिडीयम कॉमर्स चा 100 % निकाल लागला त्यात कु. शिवणी रजक हिने 82.17% घेऊन महाविद्यालयात प्रथम आली. द्वितीय सुमित गिरडकर 54.17% प्राप्त झाले.
तसेच मराठी मिडीयम कॉमर्स चा 70% निकाल लागला त्यात कू तनुश्री अमृत आतमांडे 60.33% , कु दिक्षा भास्कर वांढरे 60.33%तर कला शाखेचा निकाल 60% लागला. कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम हर्षल धनवलकर 74.50% , द्वितीय रामकेश रविकुमार 65.67% तर तृतीय कू. आरती बोंकुरवार 65.50% मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ कायरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण तसेच प्राध्यापकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिले.