Home Breaking News ◻️काव्यरचना◻️आधार◻️

◻️काव्यरचना◻️आधार◻️

436

◻️काव्यरचना◻️आधार◻️

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

◻️चला जाऊ वृद्धाश्रमात
त्यांना देण्यास आधार
करूनी चैतन्य निर्माण
तयासी करू स्वप्न साकार

◻️वृद्ध बघतात दिनी प्रतीक्षा
कुणी येणार मजसी घेण्यास
विरह होई मनी सांजवेळी
तरी पुढे व्हा आधार देण्यास

◻️तसेची किती अनाथ बालके
येती आश्रमात नकळुनी
दावी समर्थकता ,ममत्व
मातापित्यांचे आधार देऊनी

◻️एकमेका सहाय्यता करुनि
बना बाल वृद्धांची काठी
प्रेम माया ममता असावी
निराधारांना सदा मदतीसाठी…

♦️◻️▪️सौ. शैला चंद्रकांत चिमडयालवार , सहज सुचलं काव्यकुंज सदस्य सावली जि.चंद्रपूर