Home Breaking News Ballarpur taluka@ news • विसापूर फाट्यावर सुपर बसेस थांबवा : वंचित बहुजन...

Ballarpur taluka@ news • विसापूर फाट्यावर सुपर बसेस थांबवा : वंचित बहुजन युवा आघाडी

219

Ballarpur taluka@ news
• विसापूर फाट्यावर सुपर बसेस थांबवा : वंचित बहुजन युवा आघाडी

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर हे गाव आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव असल्यामुळे नेहमी इथे वर्दळ असतात चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या बल्लारपूर कडून चंद्रपूर जाण्याकरिता इथे बस स्टँड आहे परंतु विसापूर फाट्यावर सुपर बसेसच्या थांबा असून सुद्धा विसापूर फाट्यावर एकही महामंडळाची सुपर बस थांबत नाही त्यामुळे इथल्या स्थानिकांना विद्यार्थ्यांना, प्रवासांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. त्यामुळे विसापूर फाट्यावर सुपर बस थांबवण्यात यावी, विसापुरातील सकाळची 6 वाजताची बस पूर्ववत करण्यात यावी, बल्लारपूर कडून चंद्रपूर कडे जाणारी गेट बस नियमित करण्यात यावी व जास्तीत जास्त गेट बस चालवण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन होणार नाही. यावेळी चंद्रपूरचे आगर प्रमुखांनी सकारात्मक उत्तर देता आम्ही लवकरात लवकर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे असे आश्वासन वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, शहर उपाध्यक्ष, कबीर घोनमोडे, अक्षय लोहकरे, अभिषेक लाकडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.