Home Breaking News Ballarpur city@ news • विदर्भातील ४ किल्यांच्या होणार्या जिर्नोव्दार मध्ये...

Ballarpur city@ news • विदर्भातील ४ किल्यांच्या होणार्या जिर्नोव्दार मध्ये • बल्हारशाह , चांदागड किल्यांची व बल्हाळशाह राजेंच्या समाधी‌ स्थळाचा सहभाग करा : रोहीत लोनारे

186

Ballarpur city@ news

• विदर्भातील ४ किल्यांच्या होणार्या जिर्नोव्दार मध्ये

• बल्हारशाह , चांदागड किल्यांची व बल्हाळशाह राजेंच्या समाधी‌ स्थळाचा सहभाग करा : रोहीत लोनारे

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

बल्लारपुर:बल्हारशाह किल्लाच्या पुणर्वसनाची मागणी जुनी असतांना विदर्भातील जिर्नोद्वारा करीता निवड केलेल्या किल्यांन मध्ये बल्हारशाह व चांदागड(चंद्रपूर) किल्यांची व बल्हाळशाह राजे आत्राम यांच्या सामाधी स्थळाची नोंद का केली नाही ?

पर्यटनाच्या दृष्टी कोनातुन विदर्भातील ४ किल्यांचा राज्य शासनाने जिर्नोव्दारा करण्यासाठी अहवाल‌ मागवीला आहे, त्यात विदर्भ राज्य आंदोलन‌ समिती,युवा आघाडी,बल्हारशाह ने शासन निर्णयाचे स्वागत करीत, जुनी मागनी असलेला बल्हारशाह किल्ला व चांदागड (चंद्रपूर)
किलय्या सह बल्हाळशाह राजे आत्राम यांच्या समाधी स्थळाचा सुद्धा समावेश कराशा अशी मागनी निवेदना मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.

ऐतीहासीक बल्हारशाह नगरीत स्वतंत्र गोंड साम्राज्याचे राजे विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्हाळशाह राजे यांच्या राजधानीचा किल्ला आहे. चांदागड म्हणजेच आताचे चंद्रपूर येथे प्राचीन की
किल्ला बल्हाळशाह राजेने वसवीला आहे. विराआंस युवा आघाडी,बल्हारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात मागील २०२० पासुन बल्हाळशाह राजे यांच्या किल्याचे व कपुर पेट्रोल पंप मागील समाधी स्थळाचे पुणर्वसन व संवर्धाना करीता सातत्याने मागनी सुरू आहे बल्हारशाह किल्याला २ कोटी निधी येऊन सुद्धा किल्याचे काम अध्याप थोडे सुद्धा झालेले नाही.

विदर्भातील नगरधन,अंबाडा,मानीकगड, धारणी या किल्यांचे जिर्णोव्दार होईल मात्र बल्हारशाह शहरातील किल्ला व चंद्रपूर शहरातील किल्ला हे अती प्राचीन असुन या गोंडकालीन किल्लांचे अध्याप पुणर्वसन झालेले नाही.

पुरातन विभागाच्या नियमा नुसार किल्याच्या १०० मीटर परीसरात खोदकाम बांधकाम करने गुन्हा असतांना बल्हाळशाह व‌ चंद्रपूर या दोन्ही किल्यांच्या १०० मीटर आत बांधकाम खोदकाम कसे केल्या गेले परवांगी कोनी‌ दिली? या वर कार्यवाही का नाही झाली?
चंद्रपुर किल्याच्या आतच संपुर्ण मार्केट, रुग्नालय, घरे, माॅल शासकीय कार्यालय,बॅक इ. कसे वसले यांना परवानगी कुणी दीली? या गोष्टींचा विचार करून जिल्हाचे ऐतीहासीक वैभव वाचवीने गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्हाचा प्राचीन इतीहास असुन जिल्हाच्या ठीकानी एकाही गोंड राजे गोंड महारानींचे स्मारक नाही, १८५७ च्या स्वतंत्र लढ्यातील विर शहीद बाबुराव शेडमाके यांचे सूद्धा स्मारक नाही, दाताळा पुलाला राजमाता हीराई राणींचे नाव देण्याची मागनी केली अस्तांना सुद्धा राम सेतु नाव त्या पुलाला देण्यात आले, ऐतीहासीक वैभव वाचवीन्याच्या द्रुष्टीने हे कीत पत योग्य आहे.

आता महाराष्ट्र शासना मार्फत विदर्भातील ४ कील्लांचे जिर्णोद्वार केले जात आहे त्यात बल्हारशाह येथील गोंड राजे खांडक्या बल्हाळशाह राजे,निलकंठशाह राजे,हीरातानी राणी यांचे समाधी स्थळ, बल्हारशाह व‌ चंद्रपूर किल्यांचा समावेश करावा व चंद्रपूर जिल्हाचा स्वतंत्र गोंडकालीन प्राचीन इतिहास वाचवीन्या करीता पुढाकार घेऊन आमच्या मागनी‌ वर विचार करून तात्काळ योग्य निर्णय घ्यावा.
वरील मागनी‌ लवकरात लवकर पुर्ण न झाल्यास जिल्हाचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरा पुढे विदर्भ राज्य आंदोलन समिती,युवा आघाडी,बल्हारशाह उपोषन करेल असे शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी माहिती दिली.

“जिल्हाचे ऐतीहासीक वैभव वाचविन्या करीता आम्ही सतत लढा कायम ठेवू,मी व‌ माझे सहकारी सातत्याने मागीन २०२० पासुन ऐतीहासीक वैभव वाचवीण्या करीता लढा देत आहोत, तसा आम्ही सातत्याने पाठ पुरावाही करत आहो. आमच्या लढा ला काही प्रमाने यश देखील मिळाले २ कोटी नगर परीषद बल्हारशाह किल्याच्या पुणर्वसन तथा संवर्धना करीता आले. समिती,युवा आघाडी,बल्हारशाह उपोषन करेल असे शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी माहिती दिली”.

पराग गुंडेवार बल्लारपुर तालुका अध्यक्ष विराआंस युवा आघाडी तथा गोंडकालीन गड,कील्ले प्रेमी यांची प्रतिक्रीया