Ghugus city@ news
• पायदळ वारीत निघालेल्या वारकऱ्यांना काँग्रेस तर्फे थंड पाणी व ज्युस वितरण
सुवर्ण भारत; पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर
घुग्घूस : आषाढी एकादशीच्या पवित्र व मंगलमय वातावरणात विठूरायाच्या दर्शनासाठी गांधी चौक येथून पायदळ वारी पालखी घेवून विदर्भाची पंढरी वढा येथे अत्यंत भक्तीमय वातावरणात भजन कीर्तन टाळ मृदंग व लेजिम पथकाच्या सह निघाली या वारीचे शहरात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किशोर बोबडे, सुधाकर बांदूरकर, सैय्यद अनवर यांच्या तर्फे पालखीचे दर्शन घेवुन वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले व वारकऱ्यां करीता पिण्याचे थंड पाणी बॉटल व थंड ज्युस बॉटल (पेपर बोट) वाटप करण्यात आले
याप्रसंगी काँग्रेस महिला अध्यक्ष संगीता ताई बोबडे, काँग्रेस नेते अलीम शेख, मोसीम शेख, रोशन दंतालवार,विशाल मादर,रोहित डाकूर,अरविंद चहांदे,शहजाद शेख, दीपक पेंदोर,देव भंडारी,साहिल सैय्यद,अभिषेक सपडी,कुमार रुद्रारप, सुमेश रंगारी, बालकिशन कुलसंगे,भैय्या भाई,रंजीत राखुंडे,अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
