Home Breaking News Chandrapur dist@ news • आ. प्रतिभा धानोरकर यांनी घेतली सोनिया गांधी व...

Chandrapur dist@ news • आ. प्रतिभा धानोरकर यांनी घेतली सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट !

473

Chandrapur dist@ news
• आ. प्रतिभा धानोरकर यांनी घेतली सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खा. बाळू धानोरकर यांच्या निधनाने धानोरकर कुटुंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तर, ते राज्यातील एकमेव खासदार असल्याने काँग्रेस पक्षाचेसुद्धा अमाप नुकसान झाले आहे. या काळात काँग्रेस पक्षाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या वतीने निवासस्थानी भेट घेत सांत्वन केले होते. भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आ. प्रतिभा धानोरकर यांनी नुकतीच दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आ.प्रतिभा धानोरकर यांना धीर दिला. तसेच जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आधार बनून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकारावे. काँग्रेस पक्ष सदैव आपल्या पाठिशी उभा असल्याची ग्वाही दिली. भेटी दरम्यान आ. धानोरकर यांच्यासह भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पार्थ धानोरकर, मानस धानोरकर, प्रविण काकडे आदीं उपस्थित होते.