Chandrapur dist@ news
• ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक संपन्न..
• घुग्घुस व पोंभुर्णा परिसरातील प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याचा मानस : देवराव भोंगळे
✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर:राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० जुलै रोजी देवराव दादा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने प्रयास सभागृह घुग्घुस व ग्रामीण रूग्णालय पोंभुर्णा येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर काल (दि. ०६ जूलै) रोजी सदर नियोजनाच्या संदर्भाने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मागील आठ वर्षांपासून सातत्याने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून दोन्ही परीसरातील हजारो गोरगरिब नागरिकांना याचा फायदा होत आला आहे. मागील वर्षी 14 हजाराच्या वर रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला व 1168 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आली होती. विविध तपासण्या या शिबिरात निःशुल्क करून देण्यात येतात.
यावर्षी ना. सुधीर मुनगंटीवार हे ६० वर्षे पुर्ण करून हिरक महोत्सवात पदार्पण करत असल्याने यावर्षीच्या शिबरांमधून निःशुल्कपणे प्रत्येक गरजू गरीब रूग्णांना या शिबीरांचा लाभ देण्याचा मानस भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केला आहे.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. रवी अल्लूरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. दुद्दलवार, डॉ. टिपणीस, वैद्यकीय अधिक्षक निवृत्ती जिवणे, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, चंद्रपूरातील नामांकित डाक्टर्स सर्वश्री डॉ. प्रसन्ना मद्दीवार, डॉ. कुणाल कापर्तीवार, डॉ. सौ. कल्पना गुलवाडे, डॉ. कीर्ती साने, डॉ. योगेश सालफडे, डॉ. देवईकर, डॉ. रेगुंडवार, डॉ. शिवजी, डॉ. मुंधडा, डॉ. माडूरवार, रवी आसुटकर उपाध्यक्ष (ग्रामीण) केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन आदिंची उपस्थिती होती.


