Home Breaking News Ballarpur city@ news • बिबट्या ने केले बकरी ची शिकार

Ballarpur city@ news • बिबट्या ने केले बकरी ची शिकार

163

Ballarpur city@ news
• बिबट्या ने केले बकरी ची शिकार
✍️ संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- काल जुना पॉवर हाऊस परिसरात बिबट्या ने बकरी ची शिकार केल्याची घटना घडली.
जुना पॉवर हाऊस परिसरात झुडपी जंगल असल्याने तिथे लोक बकऱ्या चाऱ्याला नेतात. काल सायंकाळी एका बकरी वर बिबट्या ने हल्ला करून ठार केले. या बाबत विसापुर येथील संदीप पोडे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. लवकर त्या बिबट्याचे बंदोबस्त करण्याची मागणी केली.
जुना पॉवर हाऊस ते विसापुर गावा पर्यंत झुडपी जंगल असून तिथे बिबट्या, वाघ चा वावर असतो. मागील वेळी एका कामगारांवर बिबट्या ने हल्ला करून जखमी केले होते.
पॉवर हाऊस रोड ते पेपर मिल गेट चा परिसरात बिबट्या फिरत असून पेपर मिल कामगारांनी सतर्कतेने जाणे येणे करावे शक्य असल्यास विसापूर फाट्याकडून जाणे येणे करण्याचे आव्हान संदीप पोडे यांनी केले आहे.