Chandrapur dist@ news
• छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा उद्या
चंद्रपूर :- उद्या १६ जुलै रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
भूमिपुत्र ब्रिगेड, ओबीसी जनगणना समन्वय समिती, बहुजन मेडिकल असोसिएशन, अखिल भारतीय माळी महासंघ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, धनोजे कुणबी समाज मंडळ, सत्यशोधक समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, महाराष्ट्र बेलदार समाज महासंघ, भीम आर्मी, मुस्लिम हक्क संघर्ष समिती, गुरुद्वारा प्रबंधन समिती, गोंडवाना गोटुल संस्था, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर, सोशल एजुकेशन मूव्हमेंट चंद्रपूर, महाराष्ट्र बेलदार समाज महासंघ, विमुक्त जाती व भटक्या जमाती समाज संघटना, भूमिपुत्र ब्रिगेड कामगार सेना व अन्य सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून कास्ट मास्टर्स या पुस्तकाचे लेखक, हॉवर्ड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे स्कॉलर्स डॉ. सुरेश एंगडे, बाळासाहेब मिसाळ पाटील, अहमदनगर राहणार आहेत. बाळासाहेब मिसाळ पाटील इव्हीएम भारतीय लोकशाहीसाठी घातक या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विनोद नगराळे यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. अभिलाषा गावतुरे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. पी. एम. सातपुते, अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज मंडळ, चंद्रपूर, डॉ. चेतन खुटेमाटे, सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ, चंद्रपूर, हिराचंद बोरकुटे, सत्यशोधक समाज, चंद्रपूर, बळीराज धोटे, मुख्य संयोजक, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, चंद्रपूर, खुशाल तेलंग, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, चंद्रपूर, नरेन गेडाम, सोशल एजुकेशन मूव्हमेंट, चंद्रपूर, नेताजी भरणे, भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपूर, ॲड. दत्ता हजारे, ज्येष्ठ विधिज्ञ, चंद्रपूर, डॉ. सचिन भेदे, अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ, चंद्रपूर, प्रमोद काकडे, ज्येष्ठ पत्रकार, सकाळ, अनवर अली, अध्यक्ष, मुस्लिम हक्क संघर्ष समिती, चंद्रपूर, नहिद काझी, इंसाफ बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, ॲड. वैशाली टोंगे, राज्य महासचिव, लीगल सेल, पीपीआय-डे, चंद्रपूर, दिलीप वावरे, प्रसिध्द उद्योजक, चंद्रपूर, प्रब्रह्मानंद मडावी, प्रसिद्ध साहित्यिक, मूल, चामकोर सिंग बसरा, गुरुद्वारा प्रबंधन समिती, चंद्रपूर, ॲड. पूनमचंद वाकडे, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, चंद्रपूर, इंजी. किशोर सवाने, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजनिअर, चंद्रपूर, सुरेंद्र रायपुरे, अध्यक्ष, भीम आर्मी, चंद्रपूर मा. पास्टर प्रकाश भगत आदीचे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
