Home Breaking News — ♦️जीवन एक संघर्ष♦️—

— ♦️जीवन एक संघर्ष♦️—

327

— ♦️जीवन एक संघर्ष♦️—

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◽🔸◽जीवन एक संघर्ष आहे

प्रत्येकाला लागते लढावे
आपले अस्तित्व निर्माण
करण्या संकटाशी झुंजावे //१//

◽🔸◽गरीबी आहे जणू शाप
आई करी विचार मनी
मुलांच्या भविष्याची
चिंता असे ध्यानीमनी. //२//

◽🔸◽रस्त्यावर झोपलेल्या
पाहून निष्पाप मुलांना
आई करत असे खंत
कसे वाढवू पिलांना //३//

◽🔸◽तिन माझी गोंडस बाळे
आहेत माझ्या सोबतीला
जीवन संघर्ष करीत शिकवेन
आत्मविश्वासाने जगायला //४//

🔸◽🔸जीवन संघर्ष आहे अटळ
होऊन परिस्थिती वर स्वार
झेलीत सर्वांचे वार शिकवीन
त्यांना करण्या सुखी संसार //५//

🔸◽कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य 🔸◽◽ठाणे◽🔸◽◽