Ghugus city@ news
• घुग्घुस यंग चांदा बिग्रेड नवनियुक्त शहर महिला कामगार संघटिका सौ.वनिता नियाल
✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : यंग चांदा बिग्रेड कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आले.तसेच यंग चांदा बिग्रेडचे संस्थापक व आ.किशोर जोरगेवार यांचा हस्ते सौ.वनिताताई भोदेव नियाल यांना घुग्घुस शहर महिला कामगार संघटिका पदावर नियुक्ती करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आ.किशोर जोरगेवार यांनी अभिनंदन केले, म्हणाले- संघटनेला नवी गती मिळेल.
आपण मागील अनेक वर्षांपासून यंग चांदा बिग्रेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिन,दलित,दुर्बल,शोषित, पीडीतांचे दुःख दूर करण्याचे कार्य करीत आहात.आपण घुग्घुस शहरातील महिला कामगारांचे ज्वलंत प्रश्न, समस्या व तक्रारी सोडवत त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता तत्परतेने कार्य करीत आहात.
याच आपल्या कार्याची पावती म्हणून आपणास नवीन जबाबदारी सोपविण्यात येत आहे.या जबाबदारीच्या आपण स्विकार करुन आपल्या सोबत इच्छुक काम करणाऱ्या सहकारी वर्गाला गरजू आणि होतकरुंना आपण आपल्या माध्यमातून संघटीत करून संघटनेच्या पंखाला बळ देण्याचे कार्य करत संघटनेशी एकनिष्ठ राहून संघटनेला मोठे करण्याचे कार्य करावे.
प्रमुख अतिथी यंग चांदा बिग्रेड नेत्या व बहुजन समाजआघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी,संपर्क प्रमुख सविता दंडारे,चंद्रपूर अल्पसंख्याक प्रमुख कौशर खान,बहुजन महिला अध्यक्षा चंद्रपूर विमल काटक,युती प्रमुख भाग्यश्री हांडे,व कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते.
