Home Breaking News Ghugus city news • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित महाआरोग्य...

Ghugus city news • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराची बैठक

349

Ghugus city news
• ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराची बैठक

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाच्या संदर्भात माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली.
याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना महाआरोग्य शिबिराच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

मागील ८ वर्षापासून मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता प्रयास सभागृह, घुग्घुस येथे माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया चष्मे वाटप व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठया संख्येत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.