

Ballarpur city@ news
• बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे, अमृत भारत स्टेशन योजना कार्यक्रम संपन्न
• पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानाचे आभार मानले
सुवर्णभारत: किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तीन स्थानके सह भारतातील ५०८ स्थानकांच्या विकासकामांमध्ये येथील जनतेला भेट दिली आहेत, यामुळे प्रवाशांची सोय तर होईलच शिवाय स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आज ६ ऑगस्ट रोजी अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बल्लारशाह ते मुंबई थेट ट्रेन आहे.आणि काझीपेठ पुणे ट्रेन आठवड्यातून तीन दिवस करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. नागपूर हैदराबाद वंदे भारत ट्रेन साठी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. पालकमंत्री म्हणाले की चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे काही वर्षांपूर्वी देशातील सर्वात सुंदर स्थानकांमध्ये स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. आज दोन्ही स्थानके अनुक्रमे ३४आणि २७ कोटी खर्चून विकसित केली जाणार आहेत, तसेच चांदा फोर्ट स्थानकाचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.डी.आर.एम मध्य रेल्वे नागपूर प्रफुल्ल खैरकर यांनी केले.कार्यक्रमात राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली एन.आर.यु.सी.सी सदस्य अजय दुबे,चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा अधीक्षक डॉ.रवींद्रसिंह परदेशी, माजी आमदार जैनुद्दीन झवेरी, सुदर्शन निमकर, एड. संजय धोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे, तहसीलदार डॉ.कांचन जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.अन्नम व्यंकटेश यांनी संचालन व आभार मानले.
