Home Breaking News Chandrapur city@ news • प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला आग! • घटनेची...

Chandrapur city@ news • प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला आग! • घटनेची माहिती होताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल! •पहाटेला लागली आग! •वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळाला भेट !

312

Chandrapur city@ news
• प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला आग!
• घटनेची माहिती होताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल!
•पहाटेला लागली आग!
•वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळाला भेट !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूर शहरातील प्रशासकीय भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाला आज पहाटेला आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेची माहिती होताच शहरातील अग्नी शमन दल घटनास्थळी दाखल झाले.सकाळ पासूनच अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते .
चंद्रपूर शहरातील शासकीय परिसरात असलेल्या प्रशासकीय भवनातील तिसऱ्या माळ्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आज दि. 6 ऑगस्ट ला पहाटे 3 वाजता पासून धूर निघत असल्याची बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना सूचना केली .पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला या बाबतीत माहिती दिली चंद्रपूर
महानगरपालिका, सिएसटीपीएस व बल्हारपूर येथील अग्निशमन दल आग विझवण्याचा सकाळ पासून प्रयत्न करीत होते परंतु जप्तीत असलेल्या तंबाखू जन्य पदार्थ जळत असल्याने आग लवकर आटोक्यात येत नव्हती. आगीचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पोलिस अधिकारी वर्गांनी घटना स्थळाला भेट दिली.