◼️◻️विशेष लेख ◼️◻️
….. मैत्री दिन………
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
मैत्री असावी सागरासारखी
विशालतेत समावलेली
मैत्री असावी नभासारखी
अमर्यादेत विस्तारलेली
मैत्री मानव जीवनात आनंद देणारी, सुखद, भावस्पर्शी, मुलायम धाग्यात गुंफलेली नाजूक
कळी, हे विश्वच वेगळे असते. आपण जेंव्हा शाळेत जातो तेंव्हा पासून या मैत्रीची सुरवात होते त्या अगोदर आपल्या शेजारी असलेले सवंगडी, मित्र मैत्रिणी ज्यांच्या बरोबर आपण भातुकलीचा खेळ खेळतो, या खेळात घरातील माणसं देखील समरस होतात, आपलं बालपण आपण कधीच विसरू शकत नाही, कारण त्या सारखे अनमोल
क्षण पुन्हा जीवनात येत नाहीत.
मैत्रीत निःस्वार्थ भाव हवा, आर्थिक व्यवहार येऊ नयेत, त्यामुळे मैत्री कमकुवत होते, आपल्या सुख दुःखात जो सामील होतो, संकटात जो आपल्या साठी धावून येतो तोच खरा मित्र.
आपल्या मित्रासाठी वेळ प्रसंगी प्राणाची पर्वा करत नाही असा सच्चा मित्र मिळणे खूपच भाग्याची गोष्ट आहे. दुःखात ज्याच्या खांद्यावर आपण डोके ठेवून रडू शकतो त्यावेळी आपल्याला सावरतो, आपली गुपीते प्राणापेक्षा जास्त जपतो तो मित्र आपल्यासाठी अनमोल हिरा असतो.
मैत्रीसाठी नेहमीच कृष्ण सुदामाची गोष्ट सांगितली जाते, मैत्रीत श्रीमंत, गरीब भेदभाव नसतो, ही दरी दूर करून मैत्री होते,अन जीवलग बनतात. जीवनांता पर्यंत जी सुखद गोष्ट आपल्या कडे हवी ती म्हणजे मैत्री. यात वयाची ही अट नसते, अगदी लहान मुलं ही आजोबांचे मित्र असतात, किंवा नाती आपल्या आजीला सार विश्वासाने सांगतात, विश्वास हा एक मुद्दा खूप महत्वाचा मैत्रीत असावा लागतो. याने मैत्री फुलते, जेंव्हा विश्वासाला तडा जातो तेंव्हा मैत्री तुटते. हा धागा खूप जपावा लागतो. म्हणूनच मैत्री निस्वार्थ, निर्व्याज असली पाहीजे, कोणतीही अपेक्षा न करता केलेली मैत्री अधिक फुलते व जीवनात अधिक आनंद, सुख, समाधान देते.
©️सौ. ऋचा हनुमंत महाबळ, ◻️🔸◻️सिंधुदुर्ग◻️🔸◻️
