Home Breaking News ◽◽—बळीराजा—◽◻️

◽◽—बळीराजा—◽◻️

188

◽◽—बळीराजा—◽◻️

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

माझ्या बाप्पा बळीराजा.
माझ्या बाप्पा बळीराजा, तु गा फासी नको लावू
सोना संधीचं करून घे नको वेळ तू घालवू..

जमिनीशी तुझं नातं तुझं इमान तिच्याशी
कास्तकाराच्या कुशीत जन्मोजन्मी जन्म घेशी….
भुमिले या म्हणू नको तू कवाचं टाकाऊ…
तू राब राब राबुनिया येथे पिकवतो मोती
मोत्या परी पिकावर तुझं कुटुंब जगती..
होऊन व्यसनाच्या आधी पाय घसरून नको देऊ….

घरादाराचा इचार कर जोड धंदा काही
होतकरू माणसाला जगी काही कमी नाही
केल्यानेच होते सारे नको निराश तू होऊ…
जन्म मानवा एकदा मिळतं जन्मोजन्मी नाही
तुला सांगेल कोणीही काही बाई काही काही
भूमातेला तू तुझ्या विसरून नको जाऊ….
किती सोसून सोसते तु घावा वरी घाव
ऊन वाऱ्या पावसाचं तसं कर्जाचं न भेव
तू हिमतीचा मेरू मन हलकं नको होऊ देऊ….
माया बाप्पा बळीराजा तु गा फासी नको लावू….
◽◼️सौ .वंदना अजय आगलावे (बोढे)सहाय्यक शिक्षिका जि.प.प्रा.शाळा चारगाव पं.स.भद्रावती