Home Breaking News Ghugus city@news •भूस्खलन बाधितांच्या वतीने माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत

Ghugus city@news •भूस्खलन बाधितांच्या वतीने माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत

154

Ghugus city@news
•भूस्खलन बाधितांच्या वतीने
माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपसंपादक

घुग्घुस:घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तबाधितांच्या वतीने माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून १६९ भूस्खलनबाधितांना शासकीय भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याअनुषंगाने भूस्खलनबाधितांनी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच त्यांचे आभार मानले.

यापूर्वी भाजपातर्फे भूस्खलनबाधितांना प्रत्येकी तीन हजार रुपयाची तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली होती तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयाचा धनादेश, धान्यकीट, सहा महिन्याचे घरभाडे देण्यात आले आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, येरूरचे माजी सरपंच रमेश बुच्चे व अमराई वार्ड वासिय मोठया संख्येत उपस्थित होते.