Home Breaking News Ghugus city @news “माझी माती माझा देश” घुग्घुस नगरपरिषद तर्फे कार्यक्रम...

Ghugus city @news “माझी माती माझा देश” घुग्घुस नगरपरिषद तर्फे कार्यक्रम संपन्न…

86

Ghugus city @news
“माझी माती माझा देश” घुग्घुस नगरपरिषद तर्फे कार्यक्रम संपन्न…

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमा अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे आज दिनांक 09/08/2023 बुधवार रोजी घुग्घुस नगरपरिषद मार्फत माझी माती माझा देश या अभियान अंतर्गत ‘ पंचप्राण शपथ’ व ‘वीरो का वंदन’ अभियान राबवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, घुग्घूस चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उंदीरवाडे,महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नयन बटारकर , स.पो.नि. साखरे,पोउनि.आमटे, घुग्घुस शहरातील ज्येष्ठ नागरीक संघ, स्वातंत्र्य सैनिक,दिवंगत स्वातंत्र्य सैनिक व नगर पालिका कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी शहरातील मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी हजर होते,

सर्व उपस्थितानी पंचप्राण शपथ व माझी वसुंधरा शपथ घेतली यावेळी बोलताना सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.